Back to feed
R
Riya Sharma Love · Marathi · Life

मैत्री..... या जगातील एक छान नातं. अजूनही मैत्रीची व्याख्या कुणालाही करता आलेली नाही.... खरं सांगू.... मैत्री ही अनुभवायची असते. आणि त्या नात्याची खरी मजा मनात रुंजी घालण्यात असते.... मैत्रीला वयाचे बंधन नसते... ते भाऊ, बहीण, नवरा/ बायको, मुलं, सहकारी, विद्यार्थी, पुतणे, नातू आणि अशा कितीतरी स्वरूपात असू शकते... एव्हढेच काय परमेश्वराशीही मैत्री करणारी आपली संस्कृती.... या मैत्रीला साद घालणारी ही एक छान कविता वाचनात आली... आपणा सर्वांसाठी ती पाठवत आहे.. आवडेल अशी अपेक्षा 🙏🏼🙏🏼 *मैत्री....* चालता चालता अलगद हात हाती यावा ... हसण्यात अश्रू विरून जावा अशी मैत्री असावी. मनमोकळेपणाने बोलता यावं, वेळेचंही भान नसावं अशी मैत्री असावी. थकल्यानंतर झाडाखाली बसावं अन् ... न सांगताही मनातलं ओळखावं ... अशी मैत्री असावी. दोन घडी भेट झाली नाही तर चुटपुट लागावी.... भेटल्यावर मात्र भडाभडा बोलावं... अशी छान मैत्री असावी. एकाचं दु:ख दुसर्‍याला कळावं अन् आठवण होताच हलकं स्मित झळकावं अशी मैत्री असावी. न रुसवा, ना अबोला, ना ईर्षा, ना बढाया, ना भूलथापा, ना अविश्वास, फक्त आनंदच वाटावा... *मैत्री अशी असावी...*

0 likes 0 shares
WhatsApp