मित्रांनो... जीवनात एकदातरी श्री गुरुचरित्र, व श्री वामनबुवा रचित श्री गुरुलीलामृत वाचा, जीवनाच व पुढच्या सात जन्माच सार्थक होइल... तर मित्रांनो श्री गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते १.) आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते. २.) आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. ३.) आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. ४.) यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. ५.) मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. उदाहरनार्थे...आचरेकर सरांनी सचिन च्या गालात मारलेली होती तरीही सचिन आज ही पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही. ६.) काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. ७.) आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. ८.) श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले. ९.) महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. १०.) अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. ११.) विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल तर, काही करू नका मात्र सद्गुरुना शरण जा. व श्रद्धा; भक्ती; एकाग्रता एवढी वाढवा की सद्गुरुनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे. कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतील, तरीसुद्धा तू तक्रार करू नकोस. कारण ते काटेसुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील." श्री स्वामी समर्थ वन्दे मातरम् , वन्दे गौ मातरम् 🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🍇🍎🍅🍇🍎🍅🍇🍎🍅🍅🍇🍎🍇🍅🍇🍅🍇🍅🍎🍅🍇🍎
120 likes
49 shares