Back to feed
J
Jiya Joshi Love · Marathi · Romantic

माना कि थोडी Sayco होती है । लेकिन Bayco तो Bayco होती है । बायको म्हणजे कोण असते ? बायको म्हणजे बायकोच असते . कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते , कधी ती लाडीक चाळे करणारी प्रेयसी असते , कधी ती अटीतटीने भांडणारी विरुध्द पार्टी असते . कधी ती समजून घेणारी मित्र असते, कधी त्रास देणारी डोकेदुखी असते , कधी मस्का लावणारी असते . कधी ती जवळ असावी असे वाटतांना गैरहजर असते. कधी न सांगता समजून घेते, तर कधी गैरसमज करून घेते, कधी मुलांची काळजी करते, कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते, कधी नवऱ्याला नावं ठेवते, कधी नवऱ्याचा पगार वाढवुन सांगते. कधी फिरायला नेल्यावर नखरे करते, कधी हट्टाने हौस पुरवून घेते, कधी हौसेने नवीन पदार्थ करून खाऊ घालते. .... कधी शॉपिंगने बेजार करते, कधी नवऱ्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते, कधी कोणाची गुपितं सांगते , कधी कोणाला कळु न देता गुपचूप कारभार उरकते. कधी तंबी देऊन घराबाहेर सोडते, कधी घरी यायची वाट बघत बसते. कधी सरळ सुत असते , तर कधी संशयाचे भूत असते , कधी नवऱ्याला लगाम घालु पाहते, कधी नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करते. कधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते . कधी न म्हणते---की आज मी दमले, दोन पेग मारते, कधी न संपणारी घराची ऊर्जा असते कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते. बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून Best Match म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते . म्हणूनच सांगतो मित्रांनों--- नल-दमयंती, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनु आणि आर्ची-परश्या विसरून जा, आणि आपआपल्या बायकांना जीव लावा, काय करायचे तेवढे प्रेम बायकोवरच करा ! माना कि थोडी Sayco होती है । लेकिन Bayco तो Bayco होती है । *बायकाे* नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा, ते *नवरा* नावाच्या इकडेतिकडे भिरभिरणाऱ्या *फुलपाखराला* एकाच फुलामध्ये गुंतवून ठेवतं. आपण आजारी पडलो तर या *तुफानाला* झोप लागत नाही. आपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान *देहाने तर घरात* असतं पण *मनानं* ते आपल्याभोवती फिरत असतं. आपण उदास असतो नां तेव्हा त्याच्या *ओठावर* *हसु फुलत नाही* आपण आनंदात असताना या तुफानाचं *दु:ख* चेहऱ्यावर येत नाही. थोडक्यात काय तर या तुफानमुळेच *आयुष्यात चैतन्य* आहे. बाहेरच्या *तारांकीत* जगात कितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते नां त्याचं कारण हे तुफानच आहे. *साठीनंतरच्या वयात* या तुफानाचं खरं महत्व समजतं. सगळं *गणगोत विरोधात* गेलं तरी हे तुफान आपला हात सोडत नाही. आपल्या पोटात घास जाताे तेव्हा या तुफानाला ढेकर येतो. *उतरत्या वयात* आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच "तुफान"...! पाहिजे दोस्ता पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक *तुफान* पाहीजे. 🙃Dedicated to All married members of our groups😊

0 likes 0 shares
WhatsApp