Back to feed
M
Meera Iyer Love · Marathi · Life

मन मी अन भास माझे असणे माझ्या मनात माळ खुळखुळे या गळ्यात माझे नसणे माझ्या मनात मान मोकळी हार मळ्यात मी आकाशी झालो तारांगण मी धुळीत असे इवला कण मी उगवले हिरवे पान मी वणवा जाळतो हे रान मन निजता देह निजतो सारे माझेपण शून्य खातो जाग येताच क्षणी पाहतो तो पाहणारा कोण असतो एक जाणीव भरे आकाश एक किरण पाडे प्रकाश मन कुठले मग तयास फक्त आहे हेच बाकी भास

0 likes 0 shares
WhatsApp