Back to feed
A
Anaya Agarwal Love · Marathi · Romantic

मन वेडे . . . . एक वेडे मन रसिक , प्रेमळ दुसरेही तसेच आर्जवी , लाघवी समांतर रेषा लुभावल्या अशा इंद्रधनुषयात मिसळल्या जशा . कुंतल कुंडल रससीमा तन - मन ध्यायी चंद्रमा लाघव नेत्री दाटले स्मित आर्जवी भेटले . उत्सुक , अनावर , प्रेमळ पाश अडकला जीव , सुखावला श्वास वेडे मन , सततच आस साद - प्रतिसादांची विभ्रमित आरास . चंद्रशेखर टिळक १ ऑक्टोबर २०१६ . ( एखाद्या गोष्टीची आपण अगदी जीव लावून नेटाने फार काळ तयारी करत असतो . ती जमेल , होईल असॆ जेंव्हा दिसू लागते , तेंव्हा आपलाच आपल्याच मनाशी असा काहीसा खेळ सुरू असतो ना . . . )

0 likes 0 shares
WhatsApp