मनातल विचारायचं सोडुन दुसरच विचारत असतो तु दिलेल्या उत्तरात मला हवं असलेले उत्तर शोधत असतो मनात असते तुला आकाशातल्या तारयांबद्दल विचारावं अंगाला झोंबनारया गार गार वारयाला विचारावं पण, मनातल विचारायचं सोडुन दुसरच विचारत असतो तु दिलेल्या उत्तरात मला हवं असलेले उत्तर शोधत असतो मनात येते काठावर येनारया लाटेला विचारावे अमावसेला लपुन बसलेल्या चन्द्राला विचारावे मनात येते त्या मावळत्या सुरयाला विचारावे पावसासाठी आतुर असलेल्या चातकाला विचारावे हे सर्व तु नसताना मनात येतं परत, तुला मनातलं विचारण्यासाठी मन बैचन होते. पण, मनातल विचारायचं सोडुन दुसरच विचारत असतो तु दिलेल्या उत्तरात मला हवं असलेले उत्तर शोधत असतो.
0 likes
0 shares