Back to feed
S
Shaurya Mehta Love · Marathi · Romantic

मनाला बेचैन करणारा हूरहूर लावणारा पावसाळl फूलपाखरा सारख सैर भैर उडायला लावणारा पावसाळl अवकाशात काले ढग दाटून आले की मनात पण आठवनीचे ढग जमा व्हायला लागतात तिकडे सरीवर सरी धो धो कोसळल्याकी आकाश स्वच्छ शुभ्र होत तसच मनाच, एखादा मन मोकळ झाल की सगळी अड़गळ दूर होती आणि नव्या स्वप्नांचे इंद्रधनू फुलत. आपल्या आठवणी पण मुंग्याच्या वारुळ सारखे असतात. त्याची खोली किती व्याप्ति किती आवाका किती याचा वरुण अंदाज येत नाही. पण त्या वारुळlतुन एक मुंगी बाहेर येती, मग दूसरी, तीसरी अशा शेकडो, हजारों, लाखो मुंग्या एकापाठोपाठ बाहेर पडतात मग त्या वारुळl चा अंदाज येतो तसच आपल्या आठवणीच एक एक करत सगळ्या बाहेर येतात मग कळत मनात किती साठ वून ठेवलय आणि पावसाला आला की पहिली आठवण येती ती गावाकड च्या पावसाल्याची मग त्या आठवणी भिजलेल्या दप्तराची असो, चिखलात खेळलेला लोंपाट असो, पंक्चर झालेली सायकल असो, तीच दप्तर भिजू नये म्हणून आपल्या डोक्या वरच मेणकापड तिला देण असो, घरी गेल्यावर आईचा रपाटा अन परत डोक पुसायला तिचा पदर असो, चुली वरची गरम झुनका भाकर असो, राणात न आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा असो, सर्धी न तापान फनफन ल्यावर रातभर जागुन तव्या वरच्या कापड़ान सगल अंग शेकनारी आई असो, चांगला पडला तर खुश होवून नाचणारा न कमी पडला तर अभालाकड़ निराश होवून वाट बगणारा बाप असो, ती छत्री, तो ओढा, ते मेण कापड, ती चूल, ती स्लीपर चप्पल, आपल्याकड चुकुन किंवा जानुन बुजून राहिलेल तीच खोड रबर .................. सगळ कस आजच दाटून आलय मनात अन नभात

10 likes 82 shares
WhatsApp