मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय... धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायच.. रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय... नव्या वहीचा वास घेता पहिल्या पानावर, छान अक्षरात आपलं नाव लिहायचय... मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय... मधली सुट्टी होताच वॉटरबैग सोडुन, नळाखाली हात धरूनच पाणी प्यायचय... कसाबसा डबा संपवत, तिखत मिठ लावलेल्या, चिंचा-बोरं-पेरु-काकडी सगळं खायचय... सायकलच्या चाकाला स्टंप धरुन, खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय... अध्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का, हा विचार करत रात्री झोपी जायचय... अनअपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी... मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय... घंटा व्हायची वाट बघत का असेना, मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय.... घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करुन, सायकलची रेस लाऊनच धरी पोचायचय.... खेळायच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या, दोन तारांमधुन निघुन बाहेर पळायचय... ती पळुन जायची मजा अनुभवायला., मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय... दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच, सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचय... दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पण, हात न धुताच फराळाच्या ताटावर बसायचय... आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी, त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचय... सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला... मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय... कितीही जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा, दप्तरांचंच ओझं पाठीवर घ्यायचय... कितीही उकदत असू दे... वातानुकुलित ऑफिसपेक्षा, पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडुन बसायचय... कितीही तुटका असु दे... ऑफिसातल्या एकट्या खुचींपेक्षा, दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचय.... "बाळपण दे गं देवा.." या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ, आता थोडा कळल्यासारखा वाटायला लागलय, तो बरोबर आहे का, हे सरांना विचारायला, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय... मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...... —
39 likes
49 shares