Back to feed
K
Kavya Sharma Love · Marathi · Romantic

मला फक्त तुझीच साथ हवी..... आयुष्यभर मला फक्त तुझीच साथ हवी गं, तुला सांभाळायला परमेश्वराने ताकद द्यावी, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... सासु-सासऱ्यांची सेवा मनापासुन करशील तु, त्यांच्या मुलीची आठवण येवु देवु नकोस तु, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... दिर,भावजय,नंणंद यांचा मान राखशील तु, त्यांच्यात एकरुप होऊन घरंदाज होशील तु, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... आपली नाती गोती मनापासुन जपशील तु, लक्ष्मी ह्या घराची,सावली ह्या घराची तु, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... तुझे आई-वडिल तसेच माझे आई-वडिल, त्यांना लेकी प्रमाणे प्रेम मनापासुन दे तु, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... सणासुदीला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दे तु, तु ही त्यांच्या सोबत सदा हासत खेळत रहा, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... ईतक प्रेम कर की त्यांना तुझाच भास होईल, ऊतार वयात त्यांचा मनापासुन संभाळ कर, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... नऊ महीने ज्यांनी माझा संभाळ केलाय त्या, माझ्या आई-बापा पासुन मला वेगळ करू नको, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... आणि हो मी असेल किंवा नसेलही पण तु माझ्या आई-बापाला अर्ध्यावर सोडु नको, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... शेवटचं एकचं सांगण त्यांच्याशी वैर करु नको तु, शेवटच्या घडीला त्यांना एकटं-एकटं सोडु नको, दुसरं तिसरं काहीच नको हिच अपेक्षा....... अगं एवढीचं अपेक्षा.... अगं एवढीचं अपेक्षा.... एवढीच अपेक्षा..........

0 likes 0 shares
WhatsApp