मला वाटायच कुणीतरी माझ्यावरही प्रेम कराव, हळूच जवळ येउन माझ्या हाताला धराव, मी अणि ती फ़क्त दोघानी मनसोक्त फिराव, तिने माझ्या अन मी तिच्या मनी अलगद शिराव म्हणुन मला वाटायच आपल्यावरही कुणीतरी प्रेम कराव...!! सिनेमाला जाव कधीतरी कॉनरच्या सीटच बुकिंग असाव, काळाकुट्ट अंधार अन पोपकोर्न शिवाय तिथे कुणीही नसाव, म्हणुन मला वाटायच कुणीतरी आपल्यावरही प्रेम कराव...!! कधीतरी कुणीतरी मला SMS कराव, अन मीही खुळा प्रेमी होउन त्याला उत्तर द्याव, मला वाटायच कधीतरी आपणही प्रेम कराव...!! दिवस सम्पवणारया सुर्याला साक्षी ठेवून, गुलाबाचे नुकतेच उमललेले फुल तिच्या हातात द्याव इंग्रजीत न्हवे तर मराठीत तुज्यावर माझे प्रेम आहे म्हनाव, मला वाटायच कुणीतरी माझ्यावरही प्रेम कराव...!
0 likes
0 shares