Back to feed
A
Aditya Rao Love · Marathi · Romantic

मला वेड लागले प्रेमाचे..... रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे नादावले, धुंदावले, कधी गुंतले मन बावळे नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला खुलता कळी उमलून, हा मनमोगरा गंधाळला हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे.....

100 likes 64 shares
WhatsApp