Back to feed
V
Vanya Das Love · Marathi · Romantic

मिलनाचा अतर्क्य बिंदू सर्व जाणीवांच्या पलीकडला, झेपावून कोसळताना एका उंचीवर उसळताना. नसते मिळत निर्झरिणी, सागराला ना समुद्र भेटतो सरितेला. दोघांचे ते मिलन कसले एकरूप ते होणे कुठले. विलीन होता आत्मा परमात्म्याचे दर्शन होई. साक्षी कोण मिलनाचा, सर्वसाक्षी तो केवळ उरतो. तारांगण ते छेदून जाता, व्याप्त अथांग अवकाश होतो.

0 likes 0 shares
WhatsApp