Back to feed
K
Kunal Gupta Love · Marathi · Romantic

म्हटलं चला सहज एक फोन करून बघू काय कसं चाललंय,सहज विचारून बघू महिन्यांवर महिने उलटले मधे जरी आवाजातल्या ओलाव्यात जीव भिजवून बघू तसं फोन करून काही बदल घडणार नव्हता फोन करून बोलणार काय, विषय सापडत नव्हता का त्या शब्दांसाठी मन एवढं आसुसल होतं तिचा साधाच call , तिला फरक पडणार नव्हता नुसतंच झुरणं झालं होतं,मागे फिरणं झालं होतं डोळ्यातल्या डोळ्यात खेळण्यापलीकडे जास्त काही झालं नव्हतं बोलण्याची हिंमत तुझ्या डोळ्यात हरवून बसलो होतो हिंमत झाली जागी,पण तुला हरवून बसलो होतो म्हटलं जावं विसरून पण number तुझा save दिसतो एक दोन बटनांच्या अंतरावर तू उभी दिसते विसरू तरी कसा,number delete करू कसा नेमका ह्याच कामामध्ये mobile माझा फसतो म्हटलं चला करूच एक, होईल काय ते बघू आवाजातला कंप जरा hold करूनऐकू तुझी तशीच असेल का माझी जी स्थिती पाच-दहा मिनिटांचा गारवा, मनात साठवून बघू

0 likes 0 shares
WhatsApp