माहितीये मला की तु आधीचं कोणाचा तरी झाला आहेस मी म्हणणार नाही की तु माझा हो. फक्त म्हणणं आता एवढचं की जसा होतास तसाच रहा. भासवु नकोस की "तु माझ्या आयुष्यातून गेला आहेस". माझा हट्ट नाही की तुझे माझ्यावर प्रेम असु दे. हट्ट आता इतकाच की मनातील तुझे प्रतिबिंब तसेच राहु दे. माहिती आहे मला की डोळे तुझे वाट माझी कधीच पाहणार नाही. पण डोळे माझे वाट तुझी कधीच आयुष्यात चुकवनार नाही. माहिती आहे मला की माझ्यामुळे हास्य तुझ्या चेहऱ्यावर कधीच खुलणार नाही. पण विसरू नकोस की मी ही आता आयुष्यभर हसणार नाही. माहिती आहे मला की तुझ्या हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा अधिकार आहे.. पण माझ्या त्या गोड आठवणीतल्या, तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे.
0 likes
0 shares