Back to feed
S
Sara Bagale Motivation · Marathi · Motivation

मुहूर्ताचे वेड ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहुर्त पहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आपल्यासाठी सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!! ☀ कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...? पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..? 95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...? ☀ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ? मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...???? मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते ! ☀ शुभ मुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक, राष्ट्रपती, पंतप्रधान होईल काय..? ☀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी झाली का...? ☀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे बांधकाम करतांना, व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा कित्येकांना अपयश येते असे का...? : कारण : ☀ शुभमुहूर्त हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. ☀मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा भारत देश गिळून बसली. ☀स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच देव-ईश्वर माना. ☀ जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा. यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित. कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे. ☀ जर तुमचं मन साफ असेल व तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही " शुभ मुहूर्तच " असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या. चला..जगण्याची दिशा बदलूया..!! सुरुवात स्वतःपासून..!! - नरेंद्र दाभोळकर

43 likes 59 shares
WhatsApp