Back to feed
P
Prisha Bhat Love · Marathi · Romantic

☘"माहेरपण"☘ नव-याने तिला विचारले लग्नाला झाली वर्ष कितीतरी, अजून तुझे नवेपण मला एकदा सांग तरी असतं काय हे माहेरपण. राणी माझ्या घरची तू सासुरवास तुला न ठाऊक करतेस काय मोठे तू खास माहेरी "हितगूज" सतत सगळ्यांशी असतेस connect, smart phone हा दिमतीला Sharing caring असतेस करत whats app आहे संगतीला Get together सदैव घडे मैत्रीणींचा online झकास group प्रवासाचे कष्ट घेऊन , आणखी काय मिळते सुख आठ दिवस सुटटी घे अन मस्त धमाल कर shopping hotelling मनसोक्त करु हवय कशाला माहेरपण तिने मधाळ हसत उत्तर दिले वर्ष सरोत कितिही , ओढ काही सरत नाही सासरी गेल्याशिवाय खरंतर माहेरपण कळत नाही. सासरच्या सुखाच्या ओंजळीच मी खरतर माहेरी उधळत जाते अन त्याच आनंदाच्या घागरी त्यांच्या डोळ्यातून रित्या करते. दारात माझी वाट पाहणा-या आजीची मग मी नव्याने मैत्रीण होते, काल वेळेचे तिचे गणित मग माझ्या गप्पांतून जुळतजाते. पिल्लं सोपवून आईकडे मैत्रीणींचा जमतो कट्टा कितीतरी जुन्यानव्या तासनतास मारतो गप्पा. भेटीगाठीतून नव्याने मग अस्तित्वाच्या जुन्या खुणा शोधते, माझी हरवलेली मी मला तिथेच सापडते. आईने आठवणीने डब्यात भरुन ठेवलेला खाऊ अन बाबानी आणलेली आवडीची भाजी मरगळ झटकुन मनाची मी होते ताजी. आठवणीचे गोफ विणत लहान मी होत जाते माहेरपण म्हणजे पुन्हा एकदा बालपण मी जगून घेते.

118 likes 27 shares
WhatsApp