महिला कर्मचाऱ्यास मारहाण करून विनयभंग बीड, दि. २७ - राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळा विभागात कर्मचाºयाने महिला सहकाऱ्यास मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली. पीडित महिला कार्यशाळा विभागात कार्यरत असून, आरोपी नितीन गोरे हादेखील तेथे काम करतो. सदर महिला कार्यशाळा विभागातील आॅटो सेक्शनमध्ये काम करीत होती. यावेळी गोरे हा तेथे आला. त्याने हात पकडून महिलेस खेचले. तिने विरोध करताच वायफरने तिला मारहाण करून जखमी केले. तिच्या फिर्यादीवरून पेठबीड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी फरार असून, तपास पो.हे.कॉ. डी. बी.आवारे करीत आहेत.
118 likes
67 shares