यावं वृद्धत्व वाट पाहून राहिलेय मी कधी येईल ते वृद्धत्व पुन्हा जगू पाहतेय मी ते निरागस दुसरं बाल्यत्व नको ही रोजची धावपळ त्या वेळा जपणं सगळ्यांच्या बघावा टी व्ही मनसोक्त नि बुडावं पुस्तकांत पुलंच्या झोपावं पांघरुणात घुसुन नको ते घड्याळ काट्याचं जगणं उठावं आरामात हवं तेव्हा नको ते रटाळ घडीचं वागणं करुन घ्याव्या सुंदर कवळ्या शोभून दिसाव्या दंतकळ्या लेन्स बसवून डोळ्यांत मस्त निरखत रहावं रूपास आपल्या बदलून टाकाव्या गुडघ्यावाट्या औषधगोळ्या नसावा बाऊ वॉट्स ॲप फेसबुक जोडावे मित्र काव्यात गाण्यात दंगून जाऊ हिंडावं द-याखो-यांमधुन नि फिरत रहावं देशोदेशी रमावं पानाफुलांत नि माणसांत शोधत रहावं स्वतःस स्वतःशी असंच हसत खेळत कधी अचानक त्याचं बोलावणं यावं अखेरपर्यंत माझं हास्य असंच निरागस नि अबाधित रहावं
0 likes
0 shares