Back to feed
A
Arjun Nair Love · Marathi · Romantic

रागावली आहेस माझ्यावर, का कोण जाने... मनात आहे वादऴ तुझ्या, कुठलं कोण जाणे... म्हणालीस मला गळ्यात पडुन तुझ्या, वाटते मला रडु... पण तु रडणार, ह्या विचारानंच जिवन वाटतय कडू... माझ्यासाठी रडणार, हे ऐकुणच कसतरी होतय... मन लागेना कशात, तुझ्याकडच यायचं म्हणतय... जाणतो मी पण, मनात चाललय काय तुझ्या... आहे दुर तुझ्यापासुन, हीच खंत वाटते ह्रदयाला माझ्या... वाटतय द्यावं सारं सोडुन, जावं जगाला विसरुन... येऊन जवळ तुझ्या, घ्यावं मिठीत मिळवुन... मिठीत घेऊन तुला, रडावे देखील वाटते मला... सारुन तुझा एकटेपणा, कायमचं माझं बनवुन घ्यावं तुला... पण परी एक होऊन सुखात जगण्यासाठी, सध्या पुर्वसाथ तुझी हवी आहे मला... भविष्यात ठरवलेल्या सुखद् क्षणांसाठी, जरा झटावे लागेल आपल्याला... आश्रू्ंना बाजुला सारुन, त्याच क्षणांचा विचार कर... फक्त घाबरु नकोस धिर धर जरा, कारण मीच राजस राहणार तुझा ... आता दे हा राग दुर अन् दाटुन आलेले अश्रु बाजुला सारुन, शोभत नाही तुला.... परत एकदा गोड हसुन, त्या हनुवटीवर खळी पाडुन दाखव मला.....😊

0 likes 0 shares
WhatsApp