Back to feed
R
Riya Singh Love · Marathi · Life

रजा ! उसवतं जातात शिवलेल्या जखमा नव्याने नव्या ठिकाणी पुन्हा वेदनेची सुरु होते वेगळी कहाणी ..... मग ! जातोच मनाचा तोल ते राहतं नाही थाऱ्यावर नातही तसचं मग लटकतं राहतं वाऱ्यावर... कधीतरी परिस्थिती येतेच शेवटी भानावर पण तो पर्यंत सारंच होत अनावर प्रश्न तसेच राहतात अनुत्तरीत चूक नेमकी कोणाची ? तिची का त्याची ? तोपर्यत निघून जाते वेळ अन्! न मागता रजा मात्र मंजूर होते नात्याची !!!!

0 likes 0 shares
WhatsApp