Back to feed
N
Nisha Verma Love · Marathi · Romantic

रोज न्यारे रूप माझे पाहतो आहे जसा खूप काही आतले मज सांगतो हा आरसा आवडावे ज्यास जे ते मुखवटे मी घातले मी स्वतः विसरून गेलो मी खरा आहे कसा संयमी होता सितेला स्पर्श केला ना कधी आज वाटे चालवावा रावणाचा वारसा बोलणे काही तुझे अन् वागणे काही तुझे सांग का ठेवू तुझ्या शब्दावरी मी भरवसा घे जरा काढून तू प्रेमातल्या साय्रा अटी बघ स्विकारूनी मला तू मी जसा आहे तसा 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp