Back to feed
R
Reyansh Bhat Love · Marathi · Life

रडणार नाही मी यापुढे हसणार ही नाही यापुढे आयुष्यात तुझ्याकडे काहिही मागणार नाही मी यापुढे का दु:खात रडायचे का सुखात हसायचे कोण येणार पहायला भाव चेह-याचे सावरायला कोणाचे आधार सापडायचे मला पाहून इथे आपलेच पळायचे पुन्हा उभारेन हे आयुष्य मी माझे फक्त ही वाईट वेळ टळू दे

0 likes 0 shares
WhatsApp