Back to feed
M
Meera Singh Love · Marathi · Romantic

रात पूनव, चांदणे टिपूर होते तुझ्या श्वासात माझे श्वास होते । पापणीत ठेवले तू स्वप्नांचे किनारे ओंजळीत ठेवले तू क्षणांचे केवडे रातीत निखळले चांदण सडे... रात पूनव, चांदणे टिपूर होते तुझ्या श्वासात माझे श्वास होते । १। फुंकरीत प्राण तू ठेऊन दिले शब्दात माळले तू असे उखाणे रातीत सांडले चांदण शिंपले... रात पूनव, चांदणे टिपूर होते तुझ्या श्वासात माझे श्वास होते । २।

0 likes 0 shares
WhatsApp