*रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.* *बायको:* कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात. *नवरा:* अग मी ना...ते आपल..हे... *बायको:* (नवऱ्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची? *नवरा:* (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो! *बायको:* काय? कशाला आणलत आईला इथे? भावांकडे सोडायच होतत तिला. *(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते.* बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.) *नवरा: (अगतिकपणे)* तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे! *बायको:* का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी? *नवरा: (निग्रहाने)* आई इथेच राहील! *बायको: हो का?* मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. *काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला?* ( हे विचारतच बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. *मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहऱ्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको* दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...) *..................आई तू???*.. *आई: हो मीच.* तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. *मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!* (आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवऱ्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..) *बायको: (लाडात येत)* तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. *कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राईज दिलत! थँक यु डार्लिंग!* (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम! *नवऱ्याच्या आईचं काय ?* *आजच्या मुलींनी या वर विचार करायला हवा!!!* **बाबांनो हात जोडून विनंती करतो** *आईपेक्षा जास्त किंमत जगात कुणालाच देऊ नका !!* हा मेसेज प्रत्येक घरापर्यन्त पोहोचवतील. 👏 ***| धन्यवाद |***👏
159 likes
53 shares