Back to feed
A
Anika Bhat Love · Marathi · Romantic

रुप तुझे वर्णाया अक्षरे माझी तोकडी पडावी , एक स्मितहास्य तुझे बस्स, एक गझल बनावी आसमंत गंधाळावा, सुगंधीत श्वासांनी तुझ्या, छटा आसमंताची त्या, माझ्या मिठीत मिळावी मादकता तुझ्या स्पर्शात, नजरेत असे नशा, फक्तच कल्पनेने तुझ्या, काळीजं घायाळावी असूया तुझ्या सौंदर्याची ग्रह, तारे, नक्षत्रांनाही, अंश तुझा मिळावा, आसक्ती त्यांनाही असावी, विसावता मिठीत माझ्या गौरवर्ण मुर्त तुझी, अमुर्त ती प्रीत माझी आपसुकच विरघळावी...

0 likes 0 shares
WhatsApp