Back to feed
D
Diya Iyer Love · Marathi · Romantic

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना बनात ये ना, जवळ घे ना चंदेरी चाहूल लावीत प्रीतित ये ना प्रीतित ये ना, जवळ घे ना बेधुंद आज आसमंत सारा कुंजात गात मंद धुंद वारा दाटे उरी प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा... असा शहारा लाजेत आज ही फुले नहाती गाली अनार प्रीतगीत गाती तू ये निशा अशी करी पुकारा दे ये प्रिया मला तुझा निवारा तुझा निवारा... तुझा निवारा गीत - शांताराम नांदगावकर संगीत - अनिल-अरुण स्वर - आशा भोसले ( छायाचित्र काल्पनिक )

0 likes 0 shares
WhatsApp