Back to feed
R
Rudra Malhotra Spiritual · Marathi · Spiritual

रामायणातली आणखी एक दुर्लक्षित पतिव्रता ऊर्मिला निरोप कसला माझा घेता एकटीस मज सोडुन जाता? राम निघाले वनी काननी आदर्शच ते पुत्र म्हणूनी काय तुम्हीही हे अपेक्षिता तुम्हास म्हणतिल "मूर्त बंधुता"? निरोप का मग माझा घेता? त्यांच्यासंगे त्यांची भार्या भगिनी माझी ठरते आर्या मीही त्यजिते या ऐश्वर्या सवे न्याच मज येईन कार्या निरोप का हो घेता वाया? राम "प्रभू" ना ते तव भ्राता? "सती"च सीता ती पतिव्रता! त्यांसही नकळे मम व्याकुळता कसले देव नि कशी देवता? निरोप निर्दय माझा घेता! चित्ररुपातिल तुज रंगविता या प्रासादातिल एकांता हेच सदोदित पुसेन आता मी नाही का तव प्रिय,कांता? निरोप घेउन माझा जाता!

142 likes 55 shares
WhatsApp