Back to feed
D
Dhruv Bhat Love · Marathi · Life

लोक म्हणतात सुख शोधणं खूप सोपं असतं दुःख तर सर्वांच्या पाचवीला पुजलेलं असतं अंधारातुन वाट काढत जगायचं असतं दुःख कितीही असो अंतरी जगासमोर फक्त हसायचंच असतं सुख दुःख हे उन्ह सावली सारखं असतं जीवनात कधी गर्द नभ तर कधी अंदुक धुकं असतं प्रकाशाकडे मार्गस्थ व्हायचं असतं दुःख कितीही असो अंतरी जगासमोर फक्त हसायचंच असतं अमावस्येच्या रात्री आकाशही बिना चांदण्यांचं असतं सुख दुःखाचं जीवनात असंच काहीसं असतं पौर्णिमेची वाट बघणं शिकायचं असतं दुःख कितीही असो अंतरी जगासमोर फक्त हसायचंच असतं अंतरीच्या वेदनांना काहीच औषध नसतं वेदना सोडून जगायला मन मानत नसतं परंतु वेदनेमुळे जगणं सोडायचं नसतं दुःख कितीही असो अंतरी जगासमोर फक्त हसायचंच असतं

0 likes 0 shares
WhatsApp