Back to feed
R
Rohan Kumar Love · Marathi · Romantic

"लेक" वाचवा आपली लाडकी "लेक" वाचवा..... लेकी शिवाय घराला आपल्या, घरपन नाही | लेकी शिवाय घराला आपल्या देवपन नाही || आप-आपल्या घरा-घरात अभियान राबवा | काहीही झालं तरी पहीली आपली लेक वाचवां || लेकी शिवाय घराला आपल्या शोभाच नाही | तिच्या सारखी माया-ममता कुणालाचं नाही || आधी तिच्या बद्दलचे वाईट विचार थांबवा | काहीही झालं तरी पहीली आपली लेक वाचवां || कळी ऊमळताच तिला खुडण्यास धावु नका | तिचा जन्म होण्या आधी गर्भपात करु नका || लेक आपलीच आहे तिला दाखवु नका दुरावा | काहीही झालं तरी पहीली आपली लेक वाचवां || वाईट कृत्य करण्यास पाप लावुन घेवुचं नका | आपल्या पासुन तिला दुर कधीच सारु नका || तिच्या बद्दलच्या वाईट विचारांना अधी पांगवा | काहीही झालं तरी पहीली अपली लेक वाचवां || देवाने दिलेली अनमोल भेट आनंदात स्वाकारा | वृद्धपणात आई-वडिलांचा तिच आहे सहारा || दुखण्या-खुपण्यात कुठेही असो तिच घेते धावा | काहीही झालं तरी पहीली आपली लेक वाचवां || तिचं घराची लक्ष्मी तिचं आपल्या घराचा पाया | तिचीच असते परीवारात ममता आणि माया || लहाणाची मोठी करता आनंदात तिला वाढवा | काहीही झालं तरी पहीली आपली लेक वाचवां || आधी लेक वाचवा,प्राण गेला तरी आधी आपली लाडकी लेक वाचवा......

0 likes 0 shares
WhatsApp