लग्न झालेल्या / न झालेल्या मुला / मुलींनी नक्की वाचा.... <3 . . उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीच विचारत नाही. विचार करायला लावणारा , ह्रदयाला भिडवणारा....... तिचा फक्त एकच प्रश्न ....... देह माझा , हळद तुझ्या नावाची . हात माझा , मेहंदी तुझ्या नावाची . भांग माझा , सिंदूर तुझ्या नावाचा . माथा माझा , बिंदिया तुझ्या नावाची . नाक माझे , नथ तुझ्या नावाची . गळा माझा , मंगळसूत्र तुझ्या नावाचे . मनगट माझे , बांगड्या तुझ्या नावाच्या . पाय माझे , जोडवी तुझ्या नावाची . आणि हो..... वडीलधा-यांच्या पाया मी पडते , आणि ...... अखंड सौभाग्यवती भव । आशिर्वाद मात्र तुला. वटपौर्णिमेचे व्रत माझे , आयुष्याचे वरदान तुला . घराची काळजी घ्यायची मी, दरवाजावर नावाची प्लेट तुझी. नाव माझे , पण त्यापुढे ऒळख तुझी . इतकच काय ....... ऊदर माझे , रक्त माझे , दूध माझे, आणि मुलं ? मुलं तुझ्या नावाची . माझं सगळच तर, तुझ्या नावाचं...... तक्रार नाही ... प्लिज रागाऊही नकोस, अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारतेय.. एवढच सांग..... तुझ्याकडे काय आहे का रे, माझ्या नावाचं ? एक प्रेमी
0 likes
0 shares