Back to feed
V
Vivaan Yadav Love · Marathi · Romantic

लग्न झालेल्या / न झालेल्या मुला / मुलींनी नक्की वाचा.... . . उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीच विचारत नाही. विचार करायला लावणारा , ह्रदयाला भिडवणारा....... तिचा फक्त एकच प्रश्न ....... देह माझा , हळद तुझ्या नावाची . हात माझा , मेहंदी तुझ्या नावाची . भांग माझा , सिंदूर तुझ्या नावाचा . माथा माझा , बिंदिया तुझ्या नावाची . नाक माझे , नथ तुझ्या नावाची . गळा माझा , मंगळसूत्र तुझ्या नावाचे . मनगट माझे , बांगड्या तुझ्या नावाच्या . पाय माझे , जोडवी तुझ्या नावाची . आणि हो..... वडीलधा-यांच्या पाया मी पडते , आणि ...... अखंड सौभाग्यवती भव । आशिर्वाद मात्र तुला. वटपौर्णिमेचे व्रत माझे , आयुष्याचे वरदान तुला . घराची काळजी घ्यायची मी, दरवाजावर नावाची प्लेट तुझी. नाव माझे , पण त्यापुढे ऒळख तुझी . इतकच काय ....... ऊदर माझे , रक्त माझे , दूध माझे, आणि मुलं ? मुलं तुझ्या नावाची . माझं सगळच तर, तुझ्या नावाचं...... तक्रार नाही ... प्लिज रागाऊही नकोस, अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारतेय.. एवढच सांग..... तुझ्याकडे काय आहे का रे, माझ्या नावाचं ? °°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°° °°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°° °°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°° °°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°° °°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°° °°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°° °°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°° °°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°° °°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°° °°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°° °°°साडी मस्त शोभतीये आज-- मनमोकळी दाद दे°°° °°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°° °°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°° °°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°° °°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°° °°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°° °°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°° °°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°° °°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°° °°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°° °°°अशी काहीशी साथ दे°°° °°°मित्रत्वाचा हात दे°

0 likes 0 shares
WhatsApp