लग्न झालेल्यानी ना झालेल्यानी नक्की वाचावी अशी स्टोरी👍👍 💕गोष्ट लग्नानंतरची💕 ती, "कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का, गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय, बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८० मिसकॉल असतील. तुला कशी रे जरा सुद्धा माझी काळजी नाही. समजतोस तू कोण स्वतःला?” तो, "अगं हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमलं फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता. ती, "मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोटं बोलतोस माझ्याशी. बसला असशील मित्रांबरोबर टवाळगिरी करत. आता लग्न झालाय तुझं लहान नाहीस अजून. तो, "सोड ना राग आता ये ना मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर पटकन पळून जातो...छुमंतर... ती, "मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचं मिठीत... . राम आणि सवी.. एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला, प्रेम खूप होत दोघांचं एकमेकांवर पण सतत अशीच भांडण चालू असायची, . जास्त गंभीर नसायची. कॉलेजपासून राम सवी वर खूप प्रेम करत होता, तिचही त्याच्यावर खूप प्रेम होतं, . शिक्षण संपल्यावर रामला एक चांगली नोकरी मिळाली, स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. . तिने त्याला होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं. तो, "अगं मला वाटलं आपल्या सकाळच्या भांडणानंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात, . म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता. . मला वाटलं अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चॉक्लेट्स आणली आहेत तुझ्यासाठी." ती, "मला नको आहेत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते का रे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का? मला वाटलं मी सकाळी जरा जास्तीच नाटकं केली, तू रागावला असशील माझ्यावर म्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटलं विचारावं तुला, की तू कधी येतो आहेस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असतं." तो, "आता हे मला माहित होतं का, तूच एक एसमेस करून सांगायचं ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आता तरी ये ना मिठीत. ती, "नाही म्हणजे नाही.... मी नाही येणार जा." तो, "त्यासाठी तर मी आलोय ना इथे..." ती, "काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी सांग तू कुठे होतास इतका वेळ ते, आणि ते ही खरं खरं सांग..... तो, "बरं मग ऐक. मी ऑफिस मधून थोडं अर्धा तास उशीराच निघालो, . निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटलं तू आता रागवशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भडकशील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. . मी विचार केला फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चॉक्लेट्स घेऊन. . पण काय करू नेमका पाऊस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला की मला पुढचं नीट दिसत ही नव्हतं . आणि तेवढ्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रक वर जाऊन जोरात आदळली. . माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, . त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामी झाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो आणि पुढच्या पाच मिनिटात काय झाले मला काहीच कळले नाही... . कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती खूप वरती घेऊन गेला." सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होतं. . सवी खरोखरंच झोपताना रामशी भांडून झोपली होती आणि तिला अशीच सवय होती. . जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण वाढवण्याची. . तिने रामला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी ऐकून. तो ही घाबरला होता आणि तिला विचारत होता... तो, "अगं सवी काय झालयं, तुला बरं नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडलं का? अगं शोना बोल ना.... . काय झालं? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी." तो पाणी आणतो "हे घे पाणी, पी आता सांग काय झालं? ती, " मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तु ही नको माझ्याशी वाद घालू, . आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वर अजिबात नाही करायचं. खरंतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. . समोरासमोर बसून आपण भांडण मिटवू. " i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलता बोलता तिने पूर्ण स्वप्न सांगितले रामला... तो, "i love u too.. मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय.
0 likes
0 shares