लाजूनी हसलीस तू की फुलांचा पडतो सडा गालावरची मुग्ध खळी का पुसते सवाल खडा तुझ्या केसातील मोग-याचा गंध भुलावतो मला स्वर्णकांती सोनचाफा सखे तू भासशी मला नयनांचे तीर तुझ्या छेडीती उगाच.सखे कपाळी रुळणारी बट थोडी सार मागे मुख चंद्रमा तेजाळतो पडता कोमल रवी किरणे सांग त्या सौदमिनीला नको जळू ह्या कारणे
0 likes
0 shares