Back to feed
K
Kabir Das Love · Marathi · Romantic

😘: लहानपणी शाळे मधे एकच ड्रेस असायचा...... खाकी चड्डी पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा... 👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦 पायात चप्पल असणं ही लक्झरी असायची...... गावात एखाद्या कडेच "बाटाची"चप्पल दिसायची! 👡👡 रेशनच्या दुकानावर लोकं चकरा मारायचे.....🏃🏼🏃🏿 तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे !🚶 वरच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे 📓 शुभंकरोती आणि बे एक बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे !😲🙏 सडा, सारवण, धुणं, भांडी बायकांना तर आरामच नव्हता😰 ज्याच्याकडे " पाणी तापवायचा बंब "तोच सगळ्यात श्रीमंत होता !🤓 दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं खोबर्याच्या तेला मधे वासाच तेल असायचं !!😙 कुठला मोती साबण अन कशाची काजू कतली 🍕 माया, प्रेम एवढं होतं की गोड लागायची वातड चकली !!🤗 भात, पोळी , गोडधोड सणासुदिलाच व्हायचे पाहुण्याला गरम आणि घरच्याला गार पोळी वाढायचे !😌 पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स आजकाल रूटीन असतं🍵🍝🍲 गरीबीला लपवणं फारच कठिण असतं स्वयंपाक घरात आता भरपूर किराणा भरलेला असतो 🍎🍇🍌 खाऊ घालायची वासनाच नाही म्हणून लोणच्याला भुरा येतो? हल्ली आता प्रत्येकाच्ं पैकेज फक्त मोठ्ठ असतं 💰 दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घर "भकास " वाटतं ?🏠 का बरे पहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत?🤔 हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत? 😉😆😅😂?🗣 काय तर म्हणे आम्ही आता हाय फाय झालो ! चार पैसे आल्यामूळे, खरंतर सगळेच पुरते वाया गेलो !! कशामुळे घात झाला काहीच का कळंत नाही ? एवढं मात्र खरं की पहिल्यासारखं सुख आता अजिबात मिळत नाही !?😪 प्रगती झाली की अधोगती ? काहीच उमजेना !?? माणसाला माणसा कडून अजिबात प्रेम मिळेना ?💔 अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटलेत अन् आधार गमावल्यामुळें " सायकियाट्रिक " जवळचे झालेत !!? भ्रमामध्ये राहु नका जागं व्हा थोडं माणसा शिवाय माणसाचं सुटत नसतं कोडं! जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत,,, 👏👏👏👏👏👏👏👏 *अन्नाचा कण* आणि *आनंदाचा क्षण*👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻खरच खुप सुन्दर आणी विचार करायला लावणारी पोस्ट आहे

64 likes 34 shares
WhatsApp