व. पु. .... एक कविता... लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस लग्नानंतर मात्र राहत नाही, एकदा लग्न लावून दिलं की देवसुद्धा खाली पाहत नाही.� मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा, तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..😉 आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो. आपला नवरा बैल आहे, असं प्रत्येक बाईला वाटत असतं.. त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख तिच्या मनात दाटत असतं 🙃 त्याचा तो गबाळा अवतार.. तिला नीट्नेटकं राहयचं असतं. तिला चार दिवस सासूचे..😊 तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं. लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ पळत कसला, रांगत असतो, कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो.😜 ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल, असं प्रत्यक्षात घडत नाही.😃 त्याच्या स्वप्नाचे पंख लावून, ती त्याच्या आकाशात उडत नाही. तो गच्चीत तिला घेऊन जातो, इंद्रधनुष्यावर चालायला.. ती सोबत पापड कुरड़या घेते, गच्चीत वाळत घालायला.😀 त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची लखलखती शुक्राची चांदणी असते, हिच्या डोक्यात गोडा मसाला आणि वर्षभराची भाजणी असते.😄 आपली बायको म्हैस आहे, असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो😃 कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो. -व. पु. प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.😃😃
250 likes
3 shares