Back to feed
S
Saanvi Singh Love · Marathi · Romantic

वचन दिले तूझ्यावाचूनी मी ना वाचीन नयनद्वारे हृदय वाचूनी वेचे वेचीन सहज राया मिळो भावांशी वाटे तवभाव मगच चक्षू वाटे वाटीनी वाटे वाटीन सपनझोका बांधी आता हा स्वप्नांचा गाव तसच तुझ्या स्वप्नी रंगूनी झूले झूलीन आज काया धन्य होईरे मजला तू पाही परमदृष्टी रत्नकांची ते तोळे तोलीन बघ मला रे मी ही पाही बुडूया डोळ्यात नजर माझी भावस्वरांच्या बोले बोलीन चिंब होऊ दोघेही जाऊ दूजा विश्वात सजल मुग्ध आर्त प्रेमाची वर्षा वर्षीन

0 likes 0 shares
WhatsApp