Back to feed
K
Kabir Agarwal Love · Marathi · Life

वेड मन माझ आज हट्ट करतय तुझ्याकडे तुझा थोडा वेळ मागतय सकाळी उठल्यावर तुलाच पहायच आहे झोपेतून जागा झाल्यावर परत तुझ्या कुशीत झोपायच आहे भर उन्हात तुझ्या सोबत चालायच आहे चटके बसता उन्हाचे कधी तुला पदराच्या सावलीत यायच आहे ऋतु शिवाय पावसाला एकदा बोलवायच आहे तुझ्यासवे चिम्ब भिजुन तुझ्या मिठीत विरघळुन जायच आहे शांत सायंकाळी समुद्र किनारी बसायच आहे अबोलिच्या फुलानी सजलेला गजरा माझ्या हाताने तुझ्या केसात माळlयचा आहे पोर्णिमेच्या रात्रि तुझा हाथ हातात घ्यायचा आहे चंद्राच्या मंद प्रकाशात चमकणार चांदण तुझ्या सोबत मोजायच आहे मन माझ तुझ्याकडे इतकाच वेळ मागत आहे जीवनाच्या प्रत्येक ऋतुमध्ये मला तुझ्या सोबत जगायच आहे ............. ❤️💞💞❤️💞💞❤️❤️💞❣️💞❤️❤️❤️💞❤️💞❤️

0 likes 0 shares
WhatsApp