❤"वेड्या मनातली तू...!❤ ° मन माझे तुला शोधतेय, तुझे मन कुणाला...? ° माझे नयन तुला पाहतात, तुझे नयन कुणाला...? ° माझे हृदय तुझ्यासाठी, तुझे हृदय कुणासाठी...? ° एकदा तरी सांग ना, थोडी तरी समजून घे ना मला...! ° अजून तुला भेटलोही नाही, तरी वाटतोस तू "माझी" मला...! ° भेट एकदा होईल आपली, तू मला ओळखशील ना...? ° मी वाट बघेन तुझी, तू नक्की येशील ना...? ° "मी अन तू राजा राणी", असं तू तेव्हा म्हणशील ना...? ° मला आठवण येते तुझी, तुलाही माझी येतेय ना...? ° कळत कसं नाही तुला माझं मन, कसं करमत तुला माझ्याविना...? ° "माझ्यासाठी तू तुझ्यासाठी मीच", असं तुला ही वाटतय ना...? ° मी तुझाच आहे ग "येडु", मी आल्यावरच बघ ना...! ❤❤❤🌹
0 likes
0 shares