Back to feed
N
Nisha Bose Love · Marathi · Romantic

वादल वारं सुटलं गो वाऱ्यानं तुफान उठलं गो भिरभिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनानं होडीला पान्यात लोटलं वादलवारं सुटलं गो ! गडगड ढगांत बिजली करी फडफड शिडात धडधड उरी एकली मी आज घरी बाय संगतीला माझ्या कुनी नाय सळसळ माडांत खोपीच्या कुडात जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं वादलवारं सुटलं गो ! सरसर चालली होडीची नाळ दूरवर उठली फेसाची माळ कमरेत जरा वाकूनिया पान्यामंदी जालं फेकूनिया नाखवा माजा दर्याचा राजा लाखाचं धन यानं जाल्यात लुटलं वादलवारं सुटलं गो ! गीत - शान्‍ता शेळके संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर - लता मंगेशकर

0 likes 0 shares
WhatsApp