Back to feed
M
Myra Agarwal Love · Marathi · Romantic

व्यक्तीचे सौंदर्य म्हणजे तिचे सुडौल शरीर नव्हे,तर बुध्दीमात्ता,गुण हेच तिचे खरे सौन्दर्य! आपण सुन्दर व्हावं, असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे; पण खरं सौन्दर्य हे सुन्दर विचार आणि आदर्श कर्म यात सामावलेले असते. आजच्या युगात लोक देह सजवण्यासाठी भरपूर धन व शक्ती खर्च करत आहेत. पण शरीर सुंदर असूनही जर त्या व्यक्तीकडे शुध्द बुध्दी नसेल,नम्रता नसेल तर त्याचे ज्ञान चक्षुहीन आहे असेच म्हणावे लागते. माणसाची उंची,पेहराव त्याच्या मोठेपणाचे निर्देशक नसून माणसाच्या विद्वत्तेवरून त्याची श्रेष्ठता ठरते. न्यूनता व मोठेपणा हे माणसाच्या श्रीमंतीवारून नव्हे, तर त्याने संपादन केलेल्या विद्येवरून ठरायाला हवे. कारण दिसतं ते रूप असतं, पण अस्सल असतं ते स्वरूप! रुपसंपदा दोन दिवसांचीच आहे हे माहीत असूनही माणूस या क्षणभंगुर रुपाच्या मागे लागतो आणि शाश्वत,चिरंतन आशा स्वरुपाला मात्र विसरतो. थोडक्यात काय तर चारित्र्य सुधारायाचे असेल, तर कर्म सुधारावे लागेल. कर्म सुधारावे असे वाटत असेल, तर वाणी सुधारावी लागेल. आणि वाणी सुधारण्यासाठी विचार सुधारावे लागतील.हेच विचार तुम्हाला सुंदरता प्रदान करतील. - @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

0 likes 0 shares
WhatsApp