Back to feed
V
Vihaan Agarwal Love · Marathi · Romantic

वयाच्या वीसाव्या वर्षी माझं लग्न ठरलं,त्यावेळी माझी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती.स्थळ तसं खूप चांगल होतं शिवाय आई बाबांची इच्छा.खूप गोंधळ उडाला होता आजवर माझ्या सर्व इच्छा पुर्ण करणारे माझे आई बाबा आज माझ्या इच्छेचा विचार का नाही करत आहेत?खर सांगायच तर माझं होणार सासर कोणालाही हेवा वाटेल असच होतं.माझा होणारा नवरा निशिकांत चोवीस वर्षांचा, राजबिंडा शिवाय पोलिस सब इंन्स्पेक्टर त्यात एकुलता एक.सासू सासरे असं छोटसं कुटुंब.लग्न डिसेंबरलाच ठरलं तारीख मार्च ची निघाली.किती लवकर करतायत माझं लग्न या विचारांनी आई बाबांचा फार राग यायचा त्याहुन जास्त राग त्या निशीकांतचा ज्याने बघताच क्षणी मला होकार दिला.लग्न ठरल्या नंतर तिस-याच दिवशी निशीकांतचा मला फोन आला.काय बोलावे मला काहीच कळत नव्हते.तेच बोलत होते.तसे ते बोलण्यावरूण खूप समजुतदार,बोलके,प्रेमळही वाटले.तरीहि मला वाटायचं एका बोलण्यावरुण कधी कोणाचा स्वभाव कळतो का?त्यांनी मला लग्नाविषयीची माझी इच्छा विचारली मी ही स्पष्ट सांगीतलं मला नाही करायचं इतक्यात लग्न मी तुम्हाला कसलीच ओळखत नाही. आई बाबांची इच्छा म्हणून मी हो बोलले.त्यानंतर आमच्यातलं बोलणं मी आईला सांगितलं.ती खूप चिडली आणि तिने निशीकांतला फोन केला मी केलेल्या मुर्खपणाची माफी मागितली.खरं तर माझा त्यांना दु:खवण्याचा मुळीच हेतू नव्हता.मी फक्त माझ्या ट्रु फिलिंग्स त्यांना सांगितल्या. माझा जो काही गोंधळ उडला आहे तो त्यांना कळायला नको का?दुस-या दिवशी निशीकांत मला भेटण्यासाठी घरी आले.मी घरात साधासा ड्रेस घालुण बसले होते.दारावर बेल वाजली आई कामात होती दरवाजा मीच उघडला.त्यांना बघितल्यावर मी आईला आवाज दिला.आई बाहेर आली की झाली तीची पाहुण्यांचा आदरातिथ्य करायला सुरुवात.अरे या या या बसा ना असं म्हणून आईने त्यांना पाणी आणुन दिले आणि माझ्यावर ओरडली आधी ते कपडे चेंज करुण ये.मला फार राग आला, आता हे काय भलतच हा कधीहि येणार मग मी काय साडी नेसून बसु काय घरात?मग नशीब तेच म्हणाले आई राहुद्या काही हरकत नाही मी असा अचाणक आलो खरतरं माझचं चुकलं,मी आधी सांगायला हवं होतं.त्यावर आई म्हणाली असूद्याहो त्यात काय तूमचंच घर आहे आता हे.आई ने विचारलं कसं काय येणं केलं? त्यावर ते म्हणाले, तुमची हरकत नसेल तर मला माधुरी सोबत थोडं बोलोयचं आहे.आई म्हणाली छे हो हरकत कसली तूम्ही दोघें बोलत बसा मी चहा बणवुन आणते.तितक्यात निशीकांत म्हणाले आई चहा घेत नाही मी कॉफी कराल? मला थोडं आश्चर्यच वाटलं कारण मलाही चहा नाही कॉफीच आवडते.तसा माझाही स्वभाव मोकळाच होता पण न जाणे का मला त्यांच्या समोर मोकळं होताच येत नव्हतं.मी सुंभा सारखी अजुणही दरवाजातच उभी होती.निशीकांत म्हणाले माधुरी आत ये तुझचं घर आहे.मी दरवाजा बंद करुन थोडी आत आले.माझी काहिही बोलण्याची हिम्मत होईणा. मग काय तेच बोलले,तुमच्या घराला गच्ची आहे? मी हं, असं उत्तर दिलं.मग त्यांनी चल ना आपण गच्चीवरच जाऊण बोलुया असा हुकूमच सोडला माझ्यावर.संध्याकाळची वेळ होती आजवर या घराची प्रत्येक संध्याकाळ मी गच्चीवरच घालवली होती.सुर्यास्थाची वेळ तर माझी खूप आवडीची यावेळी आकाशात होणारे रंगांचे बदल मला फार आवडायचे.आजवर माझी सूख: ,दू:ख आयुष्याचे महत्वाचे निर्णय मी याच रंगांच्या साक्षीने घेतले होते.त्यानंतर आम्ही गच्चीवर गेलो.निशिकांत म्हणाले किती सुंदर वाटते ना, हि वेळ मला फार आवडते. संध्याकाळ झाली कि, असं गच्चीवर येऊण आकाशात बदलणारे रंग पहायला.मी आश्चर्याने त्यांच्याकडे पहातच राहिली.किती साम्य होतं आमच्या दोघांत.ते म्हणाले काय झालं अशी का बघत आहेस ? अच्छा ते सर्व जाऊदे मी ज्या कारणा साठी आलो आहे ते बोलु ओके मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे देशिल? मी हो म्हणाले त्यावर त्यांनी विचारले हं सांग तुझे जबरदस्ती लग्न करण्याचे कारण? मी आवडलो नाही का तुला? .मी ,मला नेमकं सांगता येणार नाही असं उत्तर दिलं.बरं मग तुला दुसरं कोणी आवडतं का? मी म्हणाले हो सलमान खान. त्यावर ते जोरजोरात हसु लागले आणि म्हणाले छान,छान आहे हं तुझी आवड पण येडु तो फार मोठा आहे गं तुझ्या पेक्षा आणि इकडे माझ्याकडे बघ मी काही त्याच्यापेक्षा वाईट नाही.माझे सगळे मिञ मला सलमानच बोलतात. मी तोंडातल्या तोंडात पुटपूटले किती गैरसमज स्वत: बदद्ल त्यांनी ते ऐकले आणि म्हणाले हो गैरसमज तर आहेत अाणि स्वत:वर विश्वास तर त्याहून जास्त. आता माझं मन मला काय सांगत आहे सांगू? आपलं लग्न होणार शंभर टक्के होणार. खरं सांगायच तर मला तू आवडलीच आहेस आणि तूझ्या कडेही मला नकार देण्याचे काहि विशेष कारण नाही.पण मी सांगतो तू अजुणही लहाणच आहेस अचानक ठरलेल्या लग्नामुळे गोंधळली आहेस बाकी काही नाही,आई वडील नेहमिच आपलं भलं करतात.त्यांच्या निर्णयावर कधीच शंका घेऊ नकोस.मी आजवर खूप चांगला मुलगा ,चांगला मिञ बनलो आहे मला खाञी आहे की,मी खूप चांगला पती हि बनेण आणि खरं सांगू मला खूप आवडेल तुझ्या या अश्या गोंधळलेल्या प्रवासाचा साक्षिदार व्हायला.मी शांतपणे त्यांच म्हणन ऐकत होती.तितक्यात आई ने कॉफी आणून दिली. मला गरम-गरमच कॉफी आवडते सवयी प्रमाणे मी कप उचलुन ओठांना लावला.थोडा पिऊण कप खाली ठेवला.त्यांनी तोच कप उचलुन स्वत:च्या ओठांना लावला.मी पटकन बोलले निशीकांत तो माझा उष्टा कप आहे.ते त्यावर म्हणाले. हो, का तरीच म्हंटल कॉफी या आधी कधीच एवढी टेस्टी लागली नव्हती.मी लाजेने लालबुंद झाले.नजर चोरुन खाला उतरणार तितक्यात त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले काय मग होकार ना ?मी त्यांच्या कडे पाहिलं आणि मोठ्याने आोरडुन बोलले नाही म्हणजे नाही आणि तिथुन पळ काढला.त्यानंतर ते खाली उतरुन आले आईचा निरोप घेऊन निघाले.कसे कोण जाणे पण माझे पाय आपसूकच माझ्या खोलीच्या खिडकीकडे वळले त्यांना पहायला.त्यांना कळु नये म्हणून पडद्या आड लपून पहात होते.त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली माझ्या खोलीकडे हॉर्न दिला हसले आणि निघुन गेले.नाही हे शक्यच नव्हतं त्यांना मी तिथे उभी असलेली दिसणं. कसं कळाल असेल त्यांना? इतक्या कमी वेळात किती जास्त ओळखू लागले होते ते मला माझा तर विश्वासच बसत नव्हता.राञी जेवतीनाही त्यांचाच विचार करत होते.जेवण काय खाल्लं कसं खाल्ल काहिच कळत नव्हतं. खूप हरवल्या-हरवल्या सारखं वाटत होतं.निशिकांत शिवाय कोणाचाच विचार डोक्यात येत नव्हता.नंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले.बराच वेळ प्रयत्न केला पण झोप काही येईणा,मग पुस्तक वाचायला घेतलं तरीही निशिकांत समोर दिसत होते.तितक्यात फोन वाजला,निशिकंतचा होता मी उचलुन फक्त कानाला लावला कदाचित मी त्याच फोनची वाट पहात होते.समोरुन ते बोलले माझा विचार करत आहेस ना?मी नकळत हो म्हणाले,नंतर नाही म्हणाले ,मी का करू तुमचा विचार माझ्याकडे करण्या सारखी आणखी पुष्कळ कामे आहेत.ते म्हणाले,अच्छा होका मग मघाशी मी जाताना पडद्या आडुण मला पहात का होतीस? माझी तर काय बोलतीच बंद झाली होती.पुढे ते म्हणाले माधुरी मघाशी कॉफी पिताना तू माझं नाव घेतलस खूप छान वाटलं तुझ्या तोंडुन माझं नाव ऐकायला.ए पुन्हा एकदा बोलना मी पटकन म्हणाले ,छे नाही हं काहीहि काय.ते हट्टच करु लागले माझी रिक्वेस्ट आहे बोलना प्लीज प्लीज प्लीज प्लीज,आणि तसंहि नाव असच घ्यायला सांगत आहे उखाण्यात नाही इतकी लाजतीयेस ती. मग मी म्हणाले अच्छा ठिक आहे.या आधी नाव घेतलं तेव्हा इतकं काहीच वाटलं नाही.पण,आता अचानक लाज वाटु लागली होती.मी अगदी हळु आवाजात त्यांच नावं घेतलं निशिकांत...त्यावर म्हणाले जरा मोठ्याने बोल, कि जेवली ही नाहीस आज माझ्या आठवणींत.आता माञ मला थोडा रागच आला किती मनमर्जी करावी माणसाने.मग मी रागानेच त्यांच नाव घेतलं.घ्या निशिकांत निशिकांत निशिकांत. बास ? त्यावर म्हणाले आहाहा याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे.माधुरी लग्नानंतरही असाच आवाज देशील ना? त्यादिवशी आम्ही राञीच्या दोन वाजे पर्यंत गप्पा मारल्या आम्ही कसल्या ते एकटेच बडबडत होते.पण छान वाटत होतं ते सर्व ऐकायला.त्यांनी मला त्यांच्या लहान पणीच्या आठवणी,मीञ,शाळा,काँलेज,आई-बाबांचा स्वभाव,नातेवाईक,आवडते रंग,छंद,गाणी सारं सारं काही सांगीतलं. एवढं सगळं ऐकल्यावर ते मला जराही अनोळखी वाटत नव्हते. खर तर माझ्या मनातल्या त्यांच्या बद्दलच्या सर्व शंका त्यांनी हळुहळू दूर केल्या.दोन वाजत आलेले बघुण स्वत:च म्हणाले अरे बापरे दोन वाजले गं तुझ्या सोबत बोलतोना वेळ कसा गेला कळालच नाही छे...किती बडबडतेस मला तर जराही बोलु दीले नाहीस.मी इकडे गालातल्या गालात हसत होते.त्यांना ते कसे कळाले काय माहीत मला म्हणाले हसु आलं ना की माणसाने मनसोक्त हसावं,असं लपुन छपुन नाही.ते जे काही बोलायचे ते तेव्हा मलाही आवडु लागलं होतं.खर तर नुसतं बोलणच नाही तेही थोडे थोडे आवडु लागले होते. पुढे काय माझं त्यांच्याच सोबत लग्न झालं ते थोडीच तसे ऐकणार होते माझ्या सोबत लग्न केल्याशिवाय. आज आमच्या लग्नाने एक वर्ष पुर्ण चा प्रवास केला भांडण एकदाही झालं नाही असं नाही.खरं सांगायच तर अधुण-मधुण मिच चीड चीड करत असते.जोरदार भांडुण रुसूण माहेरी जायचं तर स्वप्नच आहे माझं. पण निशिकांत या जन्मी तरी ते शक्य होऊ देणार नाहीत.या पुढचा प्रवासही असाच सुखंमय व्हावा हिच ईश्वर चरणी प्रार्थणा.सासु-सासरेच आता माझे आई- बाबा आहेत.माहेरची आठवणही होत नाही आता मला.खरचं निशीकांत बोललेले ते खरं होतं.आई वडील नेहमिच आपल्या चांगल्याचा विचार करतात. निशिकांत ने आजवर मला खुप काही दिले आज मी खुप सुखात आहे.आजच आमच्या लग्नाचा पहीला वाढदिवस मीहि आज त्यांना एक गीफ्ट देणार आहे.लवकरच आमच्याकडे एक पाहुणा येणार आहे.हो मी निशिकांतच्या बाळाची आई होणार आहे.हे कळाल्या नंतरची त्यांची जी काही प्रतिक्रीया असेल ती पहाण्यासाठी खुप अधीर झाली आहे मी.... मला बालीश म्हणनारा माझा वेडा नवरा स्वत: एखाद्या लहाण मुला पेक्षा कमी नाही.लग्न करुण आल्यावर मी मोठी होत गेले आणि ते लहाण.आता काय दोन पिल्ल संभाळताना माझी भारी दमछाक होणार आहे. होते मी वेंधळी अल्लड स्वत: मध्ये रमणारी, दिशा हरवलेल्या आकाशामध्ये स्वच्छंदे उडणारी. तुझ्या येण्याने ख-या अर्थाने जगण्याचे अर्थ कळाले, दिशा हरवलेल्या पक्षाला तू अलवार तुझ्या पंखांखाली घर दीले. तू सावरलस,तू स्थिरावलस तू संभाळून घेतलस सारं, गोंधळलेल्या माझ्या सारख्या पाखराला कधीच वाटले नाही परके हे घरं. आता माञ तुझ्या सोबत क्षितिजा पर्यंत जायचे आहे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला डोळे भरुण पहायचे आहे......

0 likes 0 shares
WhatsApp