Back to feed
K
Kavya Mishra Love · Marathi · Life

व्यसनं व्यसनं मला तुझ्या आठवांचं मनात उठणार्‍या वादळाचं व्यसनं मला तूझ्या हास्याचं त्यापाठी लपणार्‍या अश्रुंचं व्यसनं मला तूझ्या काळ्याभोर डोळ्यांच त्यात ठावं घेणार्‍या माझ्या अस्तित्वाचं व्यसन तुझ्या मोहुन टाकणार्‍या स्पर्शाचं त्यात असणार्‍या आपुलकीचं व्यसनं मला तूझ्या श्वासांच त्यात मला सामवणार्‍या तुझ्या मिठीचं व्यसनं मला तूझ्या शब्दांचं बोलला नाहीस तरी ऐकणांचं व्यसन तुझ्यासव घालवलेल्या क्षणांचं नसलास तु जवळ तरी दिसण्याचं व्यसनं झालय तुझंच अवतीभवती तु असण्याचं व्यसनं बनायचय माझचं तूझी होण्यासाठी धडपडण्याचं

0 likes 0 shares
WhatsApp