Back to feed
M
Myra Nair Love · Marathi · Romantic

वेळ असेल तुला तर, एकदाच मला भेटशील का...?? दोन शब्द बोलायचय, थोडं ऐकून घेशील का...?? • पूर्वी तू माझ्याशी, खुप काही बोलायचास...!! वेळ नसला तरी, माझ्यासाठी खुप वेळ काढायचास...!! तास न् तास माझ्याशी, खुप गप्पा मारायचास...!! नसले विषय तरी, नविन विषय काढायचास...!! काही ही बोलुन, मला खुप खुप हसवायचास...!! माझा फोन एंगेज असला की, खुप खुप रागवायचास...!! आता तुला माझी गरज नाही, असं म्हणून सारखं चिडवायचास...!! मी रुसवा धरला की, खुप नाराज व्हायचास...!! मग तुच फोन करुन, sorry ही म्हणायचास...!! आज ही मला तुझा, प्रत्येक क्षणी भास होतो...!! का रे असा वागतोस, का देतोस त्रास...!! नाही पुन्हा भेटणार, एकदा बंद पडल्यावर माझा श्वास...!! • वेळ असेल तुला तर, एकदाच मला भेटशील का...?? दोन शब्द बोलायचे होते, थोडं ऐकून घेशील का...?? 😒

0 likes 0 shares
WhatsApp