शोना कदाचित तु ही असाचं विचार करतअसशील.. छान होतास रे तू, पण जमलं नाही मला.. कळत होतं रे तुझं प्रेम, पण माझं चुकलं रे जरा.. असा नको विचार करूस कि,मी विसरलेय तुला.. मनात खोल कुठेतरी,आठवणी मध्ये साठवलंय तुला.. आठवते मलाही आपले ते स्वप्नांचे घर, तुझ्या खांद्यावरून पाहिलेली ती पावसाची सर.. वेळोवेळी तू दिलेली माझ्या हक्काची साथ, अनवाणी वाळूत चालताना माझा धरलेला हात.. हातावर रंग ठेवून उडाले पाखरू, पण तू असं जगणं नको सोडूस..स्वप्न बघ तू नवीन, तुटलाय आपल्या घराचा वासा. आता पुन्हा नको जोडूस,भेटली ना मी कधी तर.. पाहून मला रडू नको वेड्या,कसंबसं सावरलंय मी स्वःताला.. आता पुन्हा बांधू नको बेड्या,आताही तुझी आसवं मला नाही बघवणार.. तुझे भिजलेले डोळे मला नाही पहावणार, धावत येईन मी तुला सावरायला.. स्वःताच्या प्रेमाला रडताना पाहून, स्वःताला कसं आवरणार ? व्हायचं असेल तर, सगळं होईल रे ठिक.. पण वाट नको पाहूस,माझ्याशिवाय चालायला शिक.
0 likes
0 shares