शोना कदाचित तुही असाचं विचार करत असशील.. छान होतास रे तू, पण जमलंच नाही मला.. कळत होतं रे तुझं प्रेम, पण माझंच चुकलं रे जरा.. असा नको विचार करू कि,मी विसरलेय तुला.. मनात खोल कुठेतरी,आठवणीमध्ये साठवलंय तुला.. आठवते मलाही आपले ते सुंदर स्वप्नांचे घर, तुझ्या खांद्यावरून मी पाहिलेली ती पावसाची सर.. वेळोवेळी तू दिलेली मला हक्काची साथ, अन अनवाणी वाळूत चालताना माझा धरलेला हात.. हातावर रंग ठेवून उडालेले हे पाखरू, पण तू एकाएकी असं जगणं सोडू नकोस.. स्वप्न बघ तू नवीन, तुटलाय मात्र आपल्या घराचा वासा
0 likes
0 shares