शब्द हे गुंफीत जातो भावनेच्या धाग्या मधे कल्पनांचे काहूर माजले आज माझ्या मना मधे निशब्द ओठ बोलके डोळे गुंतला जीव तुझ्या मधे अस्तित्व माझे हरवून गेले प्रिये तुझ्या स्वप्ना मधे मी न माझा राहिलो आता चिंब भिजलो प्रेमा मधे अन व्यक्त केले तुझ्याचसाठी हे प्रेम माझे काव्या मधे
0 likes
0 shares