Back to feed
D
Diya Rao Good_Morning · Marathi · Spiritual

*श्री स्वामी समर्थ महाराजांनी सद्भक्तांना दिलेले 11 वचने.* *अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ ।* *गुरूदेव दत्त तो ही मीच ॥१॥* *वटवृक्ष तळी नित्य माझा वास ।* *ठेविता विश्वास मी भेटेन ॥२॥* *तुमचे नी माझे जुने खूप नाते ।* *म्हणूनिया येथें आला तुम्ही ॥३॥* *ज्याचे मुखी मंत्र “श्री स्वामी समर्थ” ।* *धरितो मी हात त्याचा नित्य ॥४॥* *माझे हाती आहे ब्रम्हांडाची गोटी ।* *सकल ही सृष्टी माझे रूप ॥५॥* *कांही न मागता देतो सर्व कांही ।* *श्रीमंती अशी ही माझी न्यारी ॥६॥* *माझे नाम घेता दारीद्र सरते ।* *दुःख ही पळते दाही दिशा ॥७॥* *खोटे नाटे मज खपणार नाही ।* *माझी दृष्टी पाही सर्व कांही ॥८॥* *जरी तुम्ही दूर समुंदर पार ।* *होईन मी घार रक्षिण्यास ॥९॥* *भिऊ नका तुम्ही मी तुमच्या पाठी ।* *माझी कृपादृष्टी तुम्हांवरी ॥१०॥* *स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर ।* *मग मी आतुर तेथें येण्या ॥११॥* *॥ राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥* *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.! "* *हम गया नहीं, जिंदा है.!!* *निश्चिन्त जा, मी आहे.!!!* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

114 likes 79 shares
WhatsApp