Back to feed
A
Anika Bagale Love · Marathi · Romantic

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर आयुष्याच्या गणिताचा भूगोल झाला असता ॥ १ ॥ फळयावर जर खडूचा हात फिरला नसता तर....अ ब क ड ,बाराखडीचा अर्थ कळला नसता. ॥ २ ॥ डोळे भरून येतात जेव्हा हातात पगार येतो. गुरूजी तुम्हीच आकार दिला, जेव्हा मातीचा मी गोळा होतो. ॥ ३ ॥ पायथागोरस, आर्किमिडिज, न्यूटनअजूनही तोंडपाठ आहेत गुरूजी. तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या रेणुसूत्रात मला तुम्हीच दिसता गुरूजी. ॥ ४ ॥ तुमच्या हातून खाल्लेला मार आजपर्यंत विसरलो नाही मी. घोड़ी करुन उभे करायचात तुम्ही आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी. ॥ ५ ॥ शाळा चुकवायचो कित्तेकदा उनाडक्या करतांना. पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासतांना. ॥ ६ ॥ आज मात्र तुम्ही सोशल साईटवर चेष्टेचा विषय झालात मास्तर कोमात; गुरूजी जोमात. मास्तर पळाला; यात्रेला गेला ॥ ७ ॥ असल्या कमेंट्स जेव्हा लोक करतात. काळीज फाटतंय हो गुरूजी आमचे आदर्श रोज मरतात . ॥ ८ ॥ तुमची प्रतिमा मात्र माझ्या हृदयातआदरणीयच राहील. मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो. ही जाणीव माझ्या मृत्यूपर्यंत राहील. ॥ ९ ॥ ☝💐💐💐💐👏

31 likes 67 shares
WhatsApp