सुख असत शाश्वत ; दु: ख तर येत जात असतं ... खळाळणारया जीवन प्रवाहात कधीकधी उगाच शेवळासारखं साचत असतं... सुख असत शाश्वत ; दु: ख तर ... सुख भरून घेता येत ओंजळभर तहानेलेल्या जीवाला तेव्हडच तर पुरेस असतं सुख असत शाश्वत ; दु: ख तर ... जिंकण्याची असते एक नशा आगळी पण कुणासाठी कधीतरी हारणही काही औरच असतं सुख असत शाश्वत ; दु: ख तर ... फांदीवरल्या पक्षालाही असतात पोटापाण्याचे प्रश्न तरीही चोचीत गाणं घेवून आभाळाकडे झेपावत असतं सुख असत शाश्वत ; दु: ख तर ... निराशा , औदासिन्य धरतातच कधीनाकधी काजळी मनावर दु : खालाच तेव्हा मिठी मारून त्याचचं दु : ख जाणायच असतं सुख असत शाश्वत ; दु: ख तर ... जगण्याचा खरा अर्थ काय सांगू मित्रा पेला अर्धा भरलेला कि अर्धा रिकामा हे ज्याच त्यानचं ठरवायच असतं सुख असत शाश्वत ; दु: ख तर येत जात असत ...
0 likes
0 shares