Back to feed
N
Navya Singh Love · Marathi · Romantic

सख्या मला आवडतं, तुझं रागाने बरसणं बरसताना पुन्हा , माझ्यासाठी तरसणं. मी जाणून असते, तुझे सारे बहाणे मला पुरुन उरते, तुझ्या ओठातले गाणे. शब्दांची ओंजळ भरणं, तुला सहज जमतं मात्र माझे मन, तुला समजून घेताना दमतं. किती सहज तू देतोस, फुलांना सुगंध अन् रातींना सावरतोस, प्रेमाने अलगद. मला भावतो तुझा, काव्याचा व्यासंग आणि हलकेच तुझे, स्वप्नात भरणे रंग. रंगांचे गाणे आपले, असे व्याकूळ व्हावे तुझ्या - माझ्या प्रेमाने , नव्याने बहरावे.

112 likes 4 shares
WhatsApp